Saturday, June 10, 2023

पंकजा मुंडे शेवगाव- पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढवणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार

धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी टीव्ही वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना पक्षाने जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा

निवडणूक पाथर्डीतून लढवणार, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता पंकजा मुंडे परळीतून लढणार की पाथर्डींतून अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली.पंकजा मुंडे पाथर्डीतून लढणार की परळीतून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. कोणी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवावी, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार

पक्षाच्या केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. त्यामुळे यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात नेहमी विविध घडामोडींमुळे चर्चेत असणाऱ्या पाथर्डी-शेवगाव

विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे गटबाजीने त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. यात पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने पुढील विधानसभा निवडणुकीला त्यांचा पत्ता कट होणार की काय. नगर जिल्ह्यात

सर्वाधिक 3 लाख 40 हजार 393 मतदार असलेल्या या मतदारसंघात मराठा व वंजारी समाजाचे प्राबल्य आहे. वंजारी समाजावर ज्येष्ठ नेते दिवगंत गोपीनाथ मुंडे यांचा पगडा आहे. या मतदारसंघाची

पुनर्रचना झाल्यानंतर होत असलेली यंदाची चौथी विधानसभा निवडणूक आहे.एकूण मतदानापैकी शेवगाव तालुक्यातील मतदारांची संख्या 1 लाख 89 हजार 85 तर पाथर्डी तालुक्यातील मतदारांची

संख्या 1 लाख 51 हजार 308 आहे. पाथर्डी तालुक्यापेक्षा 38 हजार जास्त मतदान शेवगाव तालुक्याचे आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!