Monday, December 6, 2021

मुख्यमंत्री ठाकरेंची कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

याशिवाय राज्य आपत्ती मदत निधीच्या (एसडीआरएफ) माध्यमातून प्रभावित व्यक्तींना मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंनी मंगळवारी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं. ‘भूकंप, अवर्षण, पूर आल्यानंतर नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाते. त्यानंतर याचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदत दिली जाते. कोरोना संकटाला आपण सगळ्यांनी एक नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वीकारलं आहे.

त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांची उपजीविका संकटात सापडली आहे, त्यांना आर्थिक मदत दिली जावी,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते.मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याच्या वृत्ताला मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी दुजोरा दिला. ‘कोरोना संकट एक आपत्ती आहे.

पण या संकटाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या संकटाचा फटका बसलेल्यांना वैयक्तिक स्वरुपात आर्थिक मदत देता येत नाही. कोरोनाला नैसर्गिक संकट घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात यावा. केंद्रानं यासंदर्भात पावलं उचलायला हवीत,’ असं कुटेंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!