माय महाराष्ट्र न्यूज:पुढील ५ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
तर १२ ते १४ या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
१५ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत देशातील अनेक भागांतील कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने वाढ होईल. तर आजपासून
पश्चिम बंगालमध्ये आणि उद्यापासून ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.राज्यात कमाल तापमान वाढणार असले, तरीही बंगालच्या उपसागरातून येणार्या बाष्पयुक्त वार्यांमुळे आगामी
चार दिवसांत धुळे, नगर, नाशिक येथे गारपीट, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तसेच बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे वाहत राज्यात येत आहेत, त्यामुळे
दिवसभर कडक ऊन तर सायंकाळी सोसाट्याच्या वार्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.१२ ते १५ एप्रिलदरम्यान प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आहे. त्यातही
धुळे, नाशिक व नगर येथे गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे, तर उर्वरित भागात सोसाट्याच्या वार्यासह हलका ते मध्यम पाऊस होईल.