Wednesday, December 8, 2021

पत्रकार दातीर हत्याकांड: कुटुंबांची देवेंद्र फडवणीस भेट घेणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राहुरी तालुक्यामध्ये काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार खून झाले असून आत्तापर्यंत त्या खुनाचा तपास लागला नाही आरोपी हे मोकाट फिरत आहे.

पत्रकार रोहिदास दातीर यांनी वेळोवेळी राहुरी पोलीस स्टेशनला संरक्षणाची मागणी केली होती परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण दिले गेले नाही त्यांच्या अपहरण झाल्यानंतरही त्यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपींना अटक करावी.

अशी मागणी केली होती परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकार रोहिदास दातीर यांचा जीव गेला. आता राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून हा तपास स्थानिक गुन्हे शाखा किंवा सीआयडी कडे वर्ग करावा तसेच तपासात असलेल्या आत्ताचे पोलीस निरीक्षक यांचे तात्काळ बदली करावी .

तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे लवकरच दातीर कुटुंबियांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे भेट घेणार आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने तपास करताना सायबर सेल व संबंधित आरोपींचा सीडीआर तपासावा जेणेकरून या हत्याकांडा मागे मुख्य सूत्रधार समोर येण्यास मदत होईल.

आज दातीर कुटुंबियांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असून पोलीस प्रशासनाची तपासामध्ये असलेली भूमिका संशयास्पद आहे असा एकंदरीत समोर येत आहे. अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे आदी उपस्थित होते

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!