Sunday, June 4, 2023

नगर ब्रेकिंग:मोठा अपघात एक ठार; तीन जखमी ;ट्रॅक्टरचे दोन तुकडे

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथे पिकअपने

ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या विचित्र भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक हा जागीच ठार झाला असून त्याठिकाणाहून पायी जाणारे तीन मुलेही जखमी झाले. ही

अपघाताची घटना गुरुवार ता.१३ एप्रिल रोजी सकाळी घडली.याबाबत डोळासणे महामार्ग पोलीसांनी दिलेली माहिती अशी की संतोष नारायण शिंदे हे (उंब्रज एक ता.जुन्नर जि.पुणे) येथील राहणार होते ते ट्रॅक्टर

घेऊन आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. गुरूवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात आले असता त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने ट्रॅक्टरला

जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरचालक संतोष नारायण शिंदे हे जागीच ठार झाले. तर त्याच दरम्यान त्या ठिकाणाहून जाणार्‍या तीन मुलांनाही धडक बसली त्यामुळे

अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे, राणी लहु लोहकरे हे तिघेही जखमी झाले आहे.अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेतून जखमी मुलांना

संगमनेर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी, भरत गांजवे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टोलनाक्याचे कर्मचारीही

क्रेन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रॅक्टर महामार्गावरून बाजूला घेण्यात आला. भीषण अपघात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले होते. तर पिकअप चालक हा पळून गेला होता.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!