Saturday, November 27, 2021

पोलिसांनो ! मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) आनंद लिमये,

प्रधान सचिव विनीत अग्रवाल, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेते आहे,

हा विश्वास जनतेच्या मनात पोलीस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाच्या लढाईत पोलीस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी पोलीस यंत्रणेला दिला

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!