Saturday, July 2, 2022

‘ज्ञानेश्वर’च्या ऊसतोड मजुराच्या मुलीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भेंडा येथील होते.लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीचे काम करणाऱ्या ऊसतोड मजुराच्या मुलीची हरियाणा येथे होणाऱ्या अंतरविद्यापीठ कुस्ती (मुली) स्पर्धेकरिता 68 किलो वजन गटातून निवड झाली आहे.

मूळ पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथील रहिवासी असलेले रामभाऊ विठ्ठल खेडकर व मीरा रामभाऊ खेडकर यांची कन्या पल्लवी हिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण भगवान विद्यालयात झाले.सध्या ती अकोले तालुक्यातील राजूर येथील अड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत आहे.कु.पल्लवी यापूर्वी इयत्ता 9 व 10 वी मध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा ती अनेक कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली होती.आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते ऊस तोडणीचे काम करीत आहेत. अशा परिस्थितीत ही मुलीला उच्च शिक्षण देण्याचा व कुस्तीला प्रोत्साहन देण्याचे पल्लवीचे आई वडील करीत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बारामती येथे नुकत्याच झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत पल्लवीने 68 किलो वजन गटात पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकविल्याने तिची हरियाणा येथे होणाऱ्या अंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती (मुली) स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

भेंडा येथे ऊस तोडणीचे काम करत असलेल्या व भेंडा कारखाना येथे कोपीत राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पल्लवी भेंडा येथे आली असता पल्लवी,तिचे कोल्हापूर येथील कुस्ती प्रशिक्षक संदीप पाटील,वडील रामभाऊ व आई मीरा यांचा लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, क्रिडा प्रेमी सोपानराव महापूर,भेंड्याचे उपसरपंच दादासाहेब गजरे,पंजाब शिंदे यांनी सत्कार केला.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!