Sunday, June 4, 2023

नेवासातील प्रकार;अवैध वाळु वाहतुक रोखणाऱ्या पोलिसांना वाळू तस्करांची धक्काबुक्की

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा

अवैध वाळु वाहतुकीची कारवाई करत असतांना दोन पोलिसांना धक्काबुककी करून डॅम्पर पळवून नेल्या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करुन धक्काबुककी केल्या प्रकरणी डंपर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यबाबद पोलिस नायक राहुल बबन यादव (वय 33 वर्ष) दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की,
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधे अवेद्ध धंदे व अवेद्ध वाळू उपसा करुन वाहतुक करणारे इसमावर कायदेशीर कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन यांनी सुचना व आदेश दिलेले आहेत.
काल दि. 13 एप्रिल 2023 रोजी 23:00 वाजेचे सुमारास मी व पोहेकॉ गायकवाड असे आम्ही माझी मोटारसायकल नं MH 17 CB 5355 हि वरुन नेवासा पो स्टे हद्दीत पेट्रोलींग करत असतांना मला गुप्त बातमीदारामार्फत माहीती मीळाली की ज्ञानेश्वर मंदिराचे मागे माळी वस्तीजवळ चिंचबन शिवारात प्रवरा नदी पात्रात ता नेवासा येथे 1) कैलास पवार रा.गंगानगर नेवासा खु ता. नेवासा याचा डंपर पुढील बाजुस पांढरा रंग असलेला व पाठीमागे भगवा रंग असलेला विना नंबरचा त्यावर भाऊसाहेब बबन पोकळे रा.मधमेश्वरनगर,नेवासा खु ता नेवासा हा चालक असलेला असा अवैधरित्या चोरुन वाळू भरत आहे. आत्ता लगेच गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बाबत पोलिस निरिक्षक यांना माहीती देवून बातमीतील नमुद ठिकाणी चिंचबन शिवारात प्रवरा नदी पात्रात गेलो असता एक वाळूने भरलेला उप्पर पुढील बाजुस पांढरा रंग असलेला व पाठीमागे भगवा रंग असलेला विना नंबरचा त्यावर माझे ओळखीचा चालक भाऊसाहेब बबन पोकळे हा जोरात त्याचे ताब्यातील गाडी घेवुन नदीपात्रातून बाहेर निघाला.
त्यापाठीमागे मोटारसायकलवर कैलास पवार हा गेला. आम्ही मोटारसायकलवर सदर डंपरचा पाठलाग करुन त्यास गंगानगरकडे जाणारे रोडवर चर्चसमोर आडवुन चालक भाऊसाहेब बबन पोकळे यास वाळु वाहतुकीचा परवाना आहे अगर कसे याबाबत चौकशी करत असतांना येथे कैलास पवार आला व त्याने मला धक्काबुक्की केली. त्यावेळी माझा शर्ट फाटला, तेव्हा कैलास पवार म्हणाला तुम्ही ड्रायव्हरला सोडा गाडी जावू द्या, तुम्ही जर गाडी सोडली नाहीतर आम्ही तुम्हाला नेवासात नोकरी करु देणार नाही. तुमचे विरोधात तक्रारी करु,मीडीया कडे जावू अशी धमकी देवून मला व पोहेका गायकवाड असे आम्हाला आडवे उभा राहुन चालक भाऊसाहेब बबन पोकळे यास तु गाडीत बस. गाडी चालु कर, गाडी घेवुन जा असे वांरवार म्हणुन लागल्याने चालक भाऊसाहेब बबन पोकळे हा डंपरमधे घाईघाईत बसत असतांना पाय सटकुन खाली रोडवर पडला. त्यांमुळे त्याचे उजव्या खांद्याला मुक्का मार लागला. तेव्हा आम्ही त्यास रस्त्याचे बाजुला घेत असतांनाच कैलास पवार हा ढंम्पर मधे बसुन वाळूसह ढंम्पर पळवून घेऊन गेला आहे. त्यांनतर त्याचे पाठीमागे सुनिल धोत्रे हा मोटारसायकलवरुन जोरात निघुन गेला आहे. त्याचे मोटारसायकलचा नंबर सांगता येत नाही. कैलास पवार व सुनिल धोत्रे यांनी पळवून नेलेल्या ढम्पर व त्यातील वाळुचे वर्णन खालील प्रमाणे
3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे डंपर पुढील बाजुस पांढरा रंग असलेला व पाठीमागे भगवा रंग असलेला व त्यामधे अंदाजे 4 ब्रास वाळु असलेला असा वरील वर्णानाचा व किमतीचा ढंम्पर व त्यातील चोरुन भरलेल्या वाळुसह
सुनिल धोत्रे रा.मधमेश्वरनगर नेवासा खु., कैलास पवार रा.गंगानगर नेवासा खु ता, नेवासा, भाऊसाहेब बबन पोकळे रा. मधमेश्वर नगर नेवासा खु ता नेवासा अशानी मला व पोहेकॉ गायकवाड असे आम्ही अवैध वाळु वाहतुकीची कारवाई करत असतांना आमचे सरकारी कामात अडथळा निर्माण करुन वरील डॅम्पर पळवून नेला म्हणुन माझी त्याचेविरुद्ध फिर्याद आहे.व चालक भाऊसाहेब बबन पोकळे रा मधमेश्वर नगर नेवासा खु ता नेवासा यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आलो आहोत.
या फिर्यदिवरुन कैलास पवार भाऊसाहेब बबन पोकळे यांचे विरुद्ध भादवी कलम 353,332,379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!