Thursday, October 5, 2023

कारवाई करून तहसीलदार बंगल्या जवळ लावलेला वाळूचा डंपर चोरीला

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केल्यानंतर तहसीलदार बंगल्या जवळील मोकळ्या जागेत लावलेला डंपर चोरी गेल्या प्रकरणी नेवासा पोलिसात अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गळनिंबचे कामगार तलाठी अनिल देविचंद गव्हाणे (वय ५४ वर्षे) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात शासनातर्फे फिर्यादी दिली की, फिर्याद लिहून देतो की मी वरिल ठिकाणी राहावयास असुन महसुल विभागात सन 1990 पासून नोकरीस असुन सध्या तलाठी या पदावर काम करतो. माझ्याकडे सध्या गळनिंब सजा असुन त्या अंतर्गत गळनिंब, मंगळापुर, खेडले काजळी, सुरेगाव तर्फे दहिगाव असे गावे आहेत.

तहसिलदार नेवासा यांचे आदेशान्वये वाळु पथकामार्फत दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी अवैध वाळु वाहतुक करणारे वाहनावर कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये वाळु वाहतुक करणारा डंपर क्रमांक एमएच १२ एचडी २७२३ चे मालक रविंद्र राजाराम पवार रा. लक्ष्मीनगर, नेवासा खु यांचा असुन तो पकडुन नेवासा तहसिल कार्यालयाचे आवारात लावण्यात आला होता.
दि.५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेचे सुमारास नेवासा तहसिल कार्यालयात सरकारी कामाकरिता आलो असतांना कार्यालयातील क्लार्क ओम खुपसे यांनी मला तहसिलदार यांचे सहिनिशी आदेश दिला की पथकाद्वारे दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी पकडण्यात आलेला डंपर क्र डंपर क्रमांक एमएच १२ एचडी २७२३ हा कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेला आहे असा अदेश दिल्याने मी त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी तोंड कळविले की तहसिल कार्यालयाचे आवारात २६ जानेवारी २०२३ रोजी झेंडा वंदनाचे कार्याक्रमाकरिता आवारातील जागा अपुरी पडत असल्याने सदरचा डंपर हा तहसिलदार यांचे आदेशाने त्यांचे निवासस्थानाचे पाठीमागे शासकिय मोकळ्या जागेत लावणेत आला होता. तो सदर ठिकाणी सध्या दिसत नसुन कोणीतरी अज्ञात इसमाने त्यास पळवून घेवुन गेले आहे. त्याबाबत आपण सदरचा डंपर हा कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेला आहे. याबाबत नेवासा पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही स्वत: फिर्यादी होवुन गुन्हा रजि. दाखल करण्यात यावा असा आदेश दिल्याने मी आज रोजी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये येवून तहसिलदार यांचे आदेशाने वाळु पथकाने पकडण्यात आलेला डंपर क्र डंपर क्रमांक एमएच १२ एचडी २७२३ हा दि. २४ जानेवारी २०२३
रोजी दुपारी ४ चे नतंर ते दि. ५ एप्रिल २०२३ सकाळी ८ वाजेचे पूर्वी नेवासा फाटा तहसिलदार बंगल्याचे पाठीमागे मोकळ्या पटांगणात लावलेला सुमारे साडेतीन ब्रास वाळू असलेला २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा डंपर हा कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेला आहे.                      ( डंपरचे चित्र काल्पनिक आहे)

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!