Sunday, June 4, 2023

नदीजोड प्रकल्प संकल्पना हि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची देन-जलमित्र सुखदेव फुलारी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

भेंडा

भारतातील अनेक मोठ्या नद्यातून दरवर्षी १ लाख दशलक्ष घनमीटर पेक्षाही अधिक पाणी समुद्रात वाहून जाते. या पाण्याचा वापर वीज, वाहतूक, सिंचन यासाठी केल्यास विकास होऊ शकतो यावर डॉ.बाबासाहेबांचा विश्‍वास होता.
त्यासाठी १०० वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प ही संकल्पना मांडली होती असे प्रतिपदान जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे बसस्थान चौकात आयोजित
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती कार्यक्रमात श्री.फुलारी बोलत होते.
प्रारंभी ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अशोकराव मिसाळ यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी
ग्रामपंचायत सदस्य दिलीप गोर्डे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, उद्योजक बापूसाहेब नजन, केंद्रप्रमुख पावलस गोर्डे, बाजार समितीचे माजी सदस्य संतोष मिसाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक रमेश गोर्डे, मायकल गोर्डे, देवेंद्र काळे, पत्रकार नामदेव शिंदे,
डॉ.लहानु मिसाळ,किशोर मिसाळ, बाळासाहेब झावरे, यडूभाऊ सोनवणे, सुजित गोर्डे, दादासाहेब गजरे, बबनराव गोर्डे, रोहिदास आढागळे, सतीश चाबुकस्वार, कृष्णा गव्हाणे, लुकस गोर्डे,दादा वाघमारे, संजय फुलमाळी,नितीन ससाणे,अरुण गोर्डे,रोहित सोनकांबळे,निकिता गोर्डे आदि उपस्थित होते.
श्री.फुलारी पुढे म्हणाले की, व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कामगार, जलसिंचन आणि ऊर्जा खात्याचे मंत्री होते.या तिन्ही महत्त्वांच्या विभागाच्या नियोजनाचा पाया डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकाळात घातला गेला. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष म्हणूनही बाबासाहेबांनी काम पाहिले. भारताची श्रम, जल, वीज बहुउद्देशीय धरण प्रकल्पाची संकल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली. केंद्रीय जल आयोग व केंद्रीय विद्युत आयोग यांची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना झाली. हिराकुंड, दामोदर व सोन नद्यांवरील नदी खोरे प्रकल्पांची सुरुवात त्यांच्याच काळात झाली. १९४२ ते १९४६ या चार वर्षांच्या कालावधीत अखिल भारतीय जल धोरणाची पायाभरणी झाल्यामुळे जलसिंचन आणि विद्युत ऊर्जेची नेत्रदीपक प्रगती झाल्याचे दिसून येते.सन १९४५-४७ या काळात दामोदर नदी खोरे आणि महानदी खोरे यांच्या बहुउद्देशीय विकासासाठी योजना तयार करून राज्यातून वाहणार्‍या नद्यांचे प्रकल्प व त्यांचे व्यवस्थापन हे नदीखोरे प्राधिकरण किंवा महामंडळ स्थापना करून त्यांच्या ताब्यात दिले. याचे सारे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.
दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
पास्टर विजय गोरे यांनी आभार मानले.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.आंबेडकर जयंती साजरी

निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती साजरी करण्यात आली.
सरपंच प्रा. उषाताई मिसाळ यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपसरपंच मंगल गोर्डे, ग्रामविकास अधिकारी रेवन्ननाथ भिसे, अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, डॉ.शिवाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गोर्डे, पंढरीनाथ फुलारी,येडूभाऊ सोनवणे,डॉ. लहानु मिसाळ,संतोष मिसाळ,पावलस गोर्डे,बाबासाहेब गोर्डे,विष्णु फुलारी,रामभाऊ देशमुख आदि यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!