Saturday, January 22, 2022

साखरेची एमएसपी वाढविण्याबरोबरच एसडीएस स्पिरिटवरील जीएसटी कमी करण्याची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

साखरेची न्यूनतम विक्री किंमत 31 रुपये वरुन 34 प्रति किलो करावी,त्याच बरोबर इथेनॉलसाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष विप्रकृत मद्यार्क (एसडीएस) वरील जीएसटी 18 वरून 5 टक्के करावी अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोशिएशनने (विस्मा) केली आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोशिएशनच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची सभा विस्माचे अध्यक्ष श्री. बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या मध्ये चालू साखर हंगाम 2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यातील ऊस क्षेत्र 12.40 लाख हेक्टर असून चांगल्या पाऊसमानामुळे ऊस उत्पादकता हेक्टरी 105 टनाच्या वरती असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे विस्माच्या सप्टेंबर 2021 मधील अनुमान राज्याचे निव्वळ साखर उत्पादन 105 लाख टनावरुन 110 लाख टना पर्यंत जाण्याचे आजरोजी अंदाजित आहे. या व्यतिरिक्त सुमारे 15 लाख टन साखर, हि इथेनॉल उत्पादनाकडे वळविली जाई असे अनुमान आहे.
राज्यात आजरोजी 94 सहकारी व 92 खाजगी कार्यरत असून 380 लाख टन गाळप होऊन 36 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 9.50 % असून विभागनिहाय 1 ते 1.5 टक्का उतारा इथेनॉल निर्मितीसाठी वळला आहे. साखर उताऱ्यामध्ये सुद्धा अर्धा ते एक टक्का वाढ दिसून येत आहे. देश पातळीवर 479 साखर कारखाने कार्यरत असून 15 डिसेंबर 21 पर्यंत 78 लाख टन साखर उत्पादन असून ती गत वर्षी पेक्षा 5 लाख टन जास्तीचे आहे.
महाराष्ट्र राज्यात सहकारी 42 खाजगी 35 साखर कारखाने व 35 स्टँडअलोन असे एकूण 112 इथेनॉल प्रकल्प कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या 2019 च्या धोरणानुसार राज्यातील 337 नवीन प्रकल्पांना 6 टक्के व्याज अनुदान जाहीर केले आहे. त्यामध्ये 63 खाजगी व 59 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. इतर धान्य व मळीवर आधारीत आहेत.

सद्या ऑईल कंपन्याना करण्यात येणाऱ्या इथेनॉलवर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येतो. परंतु स्टॅडअलोन कारखान्यांना कच्चा माल हा विशेष विप्रकृत स्पिरीट (एसडीएस) साखर कारखान्यांकडून खरेदी करताना 18 टक्के जीएसटी कर भरावा लागतो. त्यामुळे स्टँड अलोन (एकल) प्रकल्पांना आर्थिक अडचणी येतात यास्तव इथेनॉल तयार करणेस्तव सर्व हकच्चा माल विशेष विप्रकृत मद्यार्क
(एसडीएस) वर देखील इथेनॉलसाठीचे 5 टक्के जी.एस.टी आकारणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याच बरोबर न्युनतम साखर विकी दर रु.31 प्रतिकिलो फेब्रुवारी 2019 पासून निर्धारित आहे. प्रतिवर्ष ऊसाच्या एफआरपी मध्ये सतत वाढ होत आहे. चालू हंगामामध्ये ती 10 टक्के उताऱ्याकरीता 2900 प्रति टन असून त्या मध्ये प्रत्येक 1 टक्का वाढीस्तव 290 रुपये आहेत. ऊस दर, ऊस तोडणी, वहातूक व प्रक्रिया खर्चा मध्ये मोठी वाढ झालेने साखर उत्पादन खर्चामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षापासून स्थिर असलेली न्यूनतम विक्री किंमत 31 रुपये वरुन 34 प्रति किलो करणे अनिवार्य असल्याचे विस्माचे कार्यकारी मंडळाची केंद्र व सरकारकडे आग्रहाची मागणी आहे अशी माहिती विस्माचे अध्यक्ष बी बी ठोंबरे व कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी दिली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!