Saturday, January 22, 2022

नगर ब्रेकींग:मुलाला अटक करण्यासाठी पोलिस आल्याचे पाहून आईचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका हद्दीतील चोरी प्रकरणातील माल वाहतूक केल्याच्या आरोपातील संशयित ट्रक चालकास ताब्यात घेण्यासाठी भल्या पहाटे पोलीस घरी आले.

याचा धक्कां सहन न झाल्याने वृद्ध मातेला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच तिचा मृत्यू झाला. विठाबाई काकडे असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस ठाणे हद्दीत एक बंधार्‍याच्या प्लेट चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील चोरीचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासात

आरोपीने एका मालट्रकमधून या मालाची वाहतूक केल्याचे समोर आले. त्यामुळे या ट्रक चालकास ताब्यात घेण्यासाठी काल गुरुवारी पहाटे पोलीस पथक शहरालगतच्या गायकवाड वस्ती येथील ट्रक चालकाच्या घरी गेले. या ट्रक चालकाची 62 वर्षीय आई आली.

आपल्या मुलाकडे पोलीस आल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. पोलिसांसमोरच त्या जागेवरच कोसळल्या. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने या महिलेला तात्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराने

या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी न करता घरी आणला. पोलिसही निघून गेले.मात्र वरिष्ठांच्या सुचनेवरून पोलिसांनी पुढील काही समस्या उद्भवू नये व पोलिसांवर आरोप होऊ नये म्हणून

शवविच्छेदन करून घेण्याचा आग्रह धरला. मात्र नातेवाईकांनी त्यास विरोध केला. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप व तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर नातेवाईक संतप्त झाले.

नातेवाईक व पोलिसात चांगलीच शाब्दीक चकमक झाली. त्यावर पोलिसांनी पोलिसांनी अधिक कुमक मागवून शेवटी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी श्रीरामपूरच्या स्मशानभूमीत नेला. उत्तरीय तपासणी नंतर त्यांचेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

करण्यात आले. शवविच्छेदनाच्या ठिकाणी एवढा मोठा पोलीस ताफा असल्याबाबत शहरात वेगळीच चर्चा रंगली होती.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!