Tuesday, January 18, 2022

या यूजर्सना मिळणार अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, फ्री एसएमएस, 600GB डेटा यासह अनेक फायदे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज आपण BSNL च्या अशाच 397 रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, फ्री एसएमएस, 600GB डेटा यासह अनेक फायदे मिळतात.

बीएसएनएलचा 397 रुपयांचा प्लॅनBSNL च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये कॉलिंग आणि इतर सेवांची वैधता 60 दिवसांची आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला दररोज 2GB हाय स्पीड (2G/3G/4G) डेटाचा लाभ मिळेल.

तसेच या प्लॅनची ​​एकूण वैधता 300 दिवस आहे. म्हणजेच, युजरला 60 दिवसांसाठी सर्व फायदे मिळतील, तर युजरला पुढील 240 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये PRBT (रिंग बॅक टोन किंवा कॉलर ट्यून) सुविधा उपलब्ध आहे.

दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वापरकर्त्याला या प्लॅनमध्ये 80Kbps च्या वेगाने अनलिमीटेड डेटा मिळत राहील.Airtel, Jio, Vi ला टक्कर देणारBSNL चा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन खाजगी टेलिकॉम

कंपन्यांच्या प्लॅनशी थेट स्पर्धा करत आहे , दरम्यान एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन, जिओचा 419 रुपयांचा नवीन प्लॅन आणि Vodafone-Idea चा 409 रुपयांचा नवीन प्लॅन BSNL च्या या प्लॅनच्या स्पर्धेत आहे. इतर टेलिकॉम

कंपन्यांच्या प्लॅनमध्ये जास्त डेटा उपलब्ध नाही किंवा जास्त वैधताही उपलब्ध नाही. चला, जाणून घेऊया इतर कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल.Airtel आणि Vodafone-idea च्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या दोन्ही कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन सारखे आहेत. या

मध्ये यूजरला दररोज 2.5GB हायस्पीड डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस यांसारख्या ऑफर्स मिळणार आहेत.तसेच Vodafone-idea त्‍याच्‍या प्‍लॅनमध्‍ये युजरच्‍या रात्री आणि वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देते.

तर, Airtel वापरकर्त्यांना FastTAG सह इतर अनेक फायदे मिळतात.रिलायन्स जिओच्या 419 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे तर, या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला दररोज 3GB डेटाचा लाभ मिळतो आणि प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे.

यामध्ये यूजरला Airtel आणि Vodafone-idea सारखी कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळेल. तसेच, वापरकर्त्याला या प्लॅनमध्ये Jio च्या अनेक मोफत अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!