Saturday, January 22, 2022

नगर ब्रेकींग:अपघात करुन आलेल्या कारने नांदूर्खीत मुलाला उडविले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी या गावात अपघात झालेल्या स्विफ्ट कारने नांदुर्खी येथे एका शाळकरी मुलाला जोराची धडक दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईबाबा

हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.अपघातात जखमी साकुरी येथील संस्थान कर्मचारी रोहोम यांचा एकुलता एक मुलगा आहे. या कारने जोराची धडक देऊन सदर चालक नांदूर्खी चौकात ही दोन

मोटारसायकलस्वारांना कट मारीत होता. तो शिर्डीच्या दिशेने पुन्हा सुसाट वेगाने गाडी वाकडी तिकडी चालवत असतानाच राजेंद्र दाभाडे यांच्या रोड लगत असलेल्या वस्तीवरही तो येऊन धडकला. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

प्रथमदर्शी पाहणार्‍या नागरिकांनी सांगितले की सदर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा प्रकार झाला आहे. सदर घटनेची माहिती काही नागरिकांनी शिर्डी पोलिसांना दिली. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. वाहकाच्या निष्काळजीपणामुळे

निष्पाप बालकाला अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अशा सुसाट वाहन चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!