Thursday, January 20, 2022

आता जगावर ‘डेल्मिक्रॉन’चं सावट… वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढताना चित्र दिसत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये करोनाच्या या नवीन विषाणूमुळे परिस्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होत चाललीय.

मात्र ओमायक्रॉनची दहशत असतानाच या देशांमध्ये आता ‘डेल्मिक्रॉन’च्या बातम्याही समोर येऊ लागल्या. पाश्चिमात्य देश करोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या दुहेरी संकटामध्ये अडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. भारतामध्ये

आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३५० रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्येही डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढतील असं यापूर्वीच तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. मात्र लसीकरण आणि डेल्टाचा प्रादुर्भाव पाहता भारताआधी युरोपीयन देश आणि पाश्चिमात्य देशांमध्ये

डेल्मिक्रॉनचा अधिक परिणाम दिसून येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आलीय.हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या कोव्हिड-१९ टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या शशांक जोशी यांनी, “डेल्मिक्रॉन या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या

एकत्र संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय,” असं सांगितलं. ओमायक्रॉन पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढलून आलेला. आतापर्यंत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव तब्बल ८९ देशांमध्ये झाला.

डेल्मिक्रॉन हा करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट नाहीय. पण यामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या स्ट्रेनचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि करोना रुग्णांची संख्या फार झपाट्याने वाढते. एका अहवालानुसार, ओमायक्रॉनचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे.

तर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशनने दिलेल्या माहितीनुसार डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावापैकी ९९.५ टक्के प्रकरण ही अमेरिकेशी संबंधित आहेत. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनमुळे अमेरिकेमध्ये आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांबरोबरच, वयस्कर व्यक्ती, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कमी लसीकरण झालेल्या भागांमध्ये हे दोन्ही व्हेरिएंट फार वेगाने प्रादुर्भाव करु

शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र दोन्ही व्हेरिएंट एकत्र येऊन एक सुपर स्ट्रेन तयार करतात की नाही यावरुन तज्ज्ञांमध्येच मतमतांतरे आहेत. काही संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अशाप्रकारे एकाच वेळी दोन व्हेरिएंट सक्रीय असले

तरी ते एकत्र येऊन नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळताही येणार नाही.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!