नेवासा
नेवासा तालुक्यातील खुणेगाव मध्ये आज शनिवार दि.१५ एप्रिल रोजी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकरी स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांच्या हस्ते खुणेगाव पंच क्रोशीतील सर्वात उंच अशा ७५ फूटी ध्वजाचे धर्मध्वजारोहण करून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली.भगवा ध्वज म्हणजेच हिंदुत्व असल्याचे प्रतिपादन स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांनी केले.
यावेळी बोलताना स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज पुढे म्हणाले की, भगवा ध्वज हे त्यागाचे, समर्पणाचे प्रतीक,संस्कृतीचा वाहक आहे.भगवा ध्वज म्हणजेच हिंदुत्व. आपण आपल्या जीवनात धर्माचं, संस्कृतीच पालन करावं.
खुणेगाव येथील जय भवानी मित्र मंडळ,भजनी मंडळ व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बाबा महाराज कदम यांनी आभार मानले.