Tuesday, January 18, 2022

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडू तीन बडे नेतेही चर्चेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा

अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी

काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदा संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर अशोक चव्हाण या पदासाठी इच्छूक नसल्याचं समजतं. नितीन राऊत यांनाही ऊर्जा खातं सोडायचं नसल्याने अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

त्यामुळे येत्या 27 डिसेंबर रोजी थोपटे अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!