Tuesday, January 18, 2022

ही काम करायचे असेल तर ते 31 डिसेंबर पर्यंत मुदत; अन्यथा मोठे नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर कोणत्याही व्यक्तीला ITR E-Filing, Epf मध्ये E-Nominee किंवा खालील गोष्टींबाबत कोणतेही काम करायचे असेल, तर ते 31 डिसेंबरपूर्वी करू शकता. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. 

1) EPFO ​​सदस्यांना UAN क्रमांक आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. जर ग्राहकांनी त्यांचा UAN क्रमांक आधारशी लिंक केला नाही तर त्यांना 31 डिसेंबरनंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, तुमचे पीएफ खाते देखील बंद केले जाऊ शकते.

2) तुमचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असल्यास, तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्ज घेऊ शकता. सणासुदीच्या दिवशी BOB ने गृहकर्जाचे व्याजदर 6.50 टक्क्यांवर आणले होते. मात्र तुम्ही हा लाभ 31 डिसेंबरपर्यंतच घेऊ शकता.

3) जे आयटीआर फाइल करतात, त्यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे. खरं तर, कोरोना विषाणू आणि पोर्टलवर भेडसावत असलेल्या अडचणींमुळे केंद्र सरकारने ही मुदत काढून टाकली होती. पण आता करदाते वेळेवर आयटीआर दाखल करू शकणार आहेत.

4) तुम्हीही पेन्शनचा लाभ घेत असाल, तर तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. तसे न केल्यास त्यांचे पेन्शन येणे बंद होईल. खरं तर, दरवर्षी अशा पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपूर्वी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते,

परंतु सरकारने त्याची तारीख वाढवली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे कारण पेन्शनधारक जिवंत असल्याचे सूचित करते.

5) SEBI ने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांच्या KYC साठी 30 सप्टेंबर 2021 ही अंतिम तारीख दिली होती. मात्र ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. म्हणजेच केवायसीशी संबंधित काम 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करून घ्यावे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!