Tuesday, January 18, 2022

अजित पवारांचे मोठे विधान:एसटीचे विलिनीकरण अशक्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच आहे. काही संघटनांनी या संपातून माघार घेतली आहे, तर काही संघटनांनी अद्याप आपल्या मागण्यांसाठी संप चालू ठेवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या

मागणीसाठी एसटी कर्मचारी अडून आहेत. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला. त्यांनी या संपाबाबत विधानसभेत बोलताना म्हणाले, एसटीचे विलिनीकरण अशक्य आहे.

कर्मचाऱ्यांनी हा विषय डोक्यातू काढून टाकावा. राज्यशासनामध्ये एसटीचे विलिनीकरण होण्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे उद्या प्रत्येक जण उठेल आणि विलिनीकरणाची

मागणी करु लागतील. प्रत्येकांनी हट्ट धरला तर कसे चालेल. कोणाचे ही सरकार असले तरी ते विलिनीकरण करु शकत नाही.एसटी कर्मचारी हे आपलेच कर्मचारी आहेत. त्यांचे विलिनीकरण करुन घेणे अशक्य आहे. पण, सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.

सर्वांनाचा भत्ता आणि पगार वाढ वेळेवर मिळलीच पाहिजे. प्रत्येकांचे कुटुंब जगले पाहिजे. कोणीही आत्महत्या करता कामा नये. यासाठीच शासनाने सकारात्मक पाऊल उचलत एसटी कर्मचाऱ्यांची पगारात वाढ केली आहे. शिवाय १० तारखेपर्यंत पगार होईल

याची हमी देखिल शासनाने घेतली आहे. जर एसटी महामंडळाकडे पैसे नसतील तर राज्य शासन कर्मचाऱ्यांचा पगार करेल व तशी हमी राज्यसरकारने घेतली असल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे एसटी बसेस बंद होत्या. या काळात सरकारने पैसे देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे पगार केले आहेत. संप मिटावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेकदा संघटनांशी चर्चा केली.

आम्ही देखिल अनेक मान्यवरांशी याबाबत चर्चा केली. एसटी कर्मचारी आपलेच कर्मचारी असल्यामुळे सकारात्मक विचार करुन कर्मचाऱ्यांचा अधिक लाभ व्हावा या दृष्टीने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. पण विलिनीकरणा बाबत ते आग्रही आहेत त्यांनी हा हट्ट आता सोडला पाहिजे.

विलिनीकरणाबाबत समिती नेमली आहे. समितीने उच्च न्यायालायाला अहवाल दिला आहे पण, समितीला अभ्यासासाठी आणखी काळ हवा आहे. समितीने तसे न्यायालायाला कळवले आहे. अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी विधान सभेत दिली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!