भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ व कार्यक्षेत्रातील पीडीएन १५००६ जातीच्या ऊसाची पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या ऊस संशोधकांनी भेट पहाणी केली.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात कोव्हीएसआय१८१२१ नावाने पीडीएन१५००६ वाणाची काही प्रमाणात लागवड झाली असून शेतकऱ्यांमध्ये कोव्हीएसआय १८१२१ व पीडीएन १५००६
वाणाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. या पूर्वी कारखाना व्यवस्थापनाने व्हीएसआयचे शास्त्रज्ञाना बोलून कोव्हीएसआय १८१२१ वाणाचे प्लॉट निश्चित करून घेतले होते. परंतु शेतकरी पीडीएन १५००६ वाणाची लागवड करून ही त्या वाणाला कोव्हीएसआय १८१२१ असे संबोधत होते. त्यासाठी या वाणाचे गुणधर्म ओळखण्यासाठी व ऊस जात पडताळणीसाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावचे प्रमुख डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस विशेषज्ञ , ऊस पैदासकार डॉ. दीपक डामसे , डॉ. रामदास गारकर, डॉ.सुरेश उबाळे, ऊस कीटक शास्त्रज्ञ डॉ. शालीग्राम गांगुडे यांचे पथकाने कारखाना कार्यक्षेत्रात येऊन ऊस बेणे प्लॉटची पहाणी केली.ज्ञानेश्वर कारखान्याचे उप शेतकी अधिकारी नंदकिशोर पाटील,ऍग्री ओव्हरशियर मंगेश नवले , गव्हाणे शरद, संजय वांढेकर यावेळी उपस्थित होते.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे शास्रज्ञ व शेतकी विभागातील कर्मचारी यांनी मठाचीवाडी येथील ऊस उत्पादक भारत पवार , दहीगांवने येथील विष्णू कडू चव्हाण, विकास सुधाकर कसबे, प्रकाश सुधाकर कसबे, गोटीराम यशवंत काळे यांच्या प्लॉट पाहणी केली व शेतकी विभागातील कर्मचारी व शेतकरी यांना पीडीएन १५००६ वाणाच्या ठळक गुणधर्मची माहिती देऊन शास्रज्ञानी या वाणाचे वैशिष्ट्य समजावून सांगितले. हा वाण सरळ उभा वाढणारा , कमी प्रमाणात पडणारा चिकणट चोपण जमिनीत प्रतिसाद देणारा व डुकराचा कमी प्रादुर्भाव असणारा आहे. त्यांनी पीडीएन १५००६ व कोव्हीएसआय १८१२१ या वाणाच्या ओळखी बाबत असलेले संभ्रम दूर केले. पीडीएन १५००६ वाणाच्या जातीची उकल शास्रज्ञानी केली. शास्रज्ञ व कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांची या वाणाबाबत व ऊस उत्पादन वाढ या विषयी सविस्तर चर्चा झाली. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांनी या वाणाचे जास्तीत जास्त बेणे लागवड करून आपले कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त बेणे निर्माण करावे तसेच पीडीएन १५००६ व कोव्हीएसआय १८१२१ या दोन वाणाची लागवड कारण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऊस विकास विभाग किंवा शेतकी गट ऑफिस यांच्याशी संपर्क साधून बेणे निवड करून त्यानंतरच लागवड करावी, आपली रीतशीर ऊस नोंद कारखाना शेतकी विभागात करावी असे आव्हान कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले.
मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर यांनी उपस्थित शास्रज्ञाचे आभार मानले.
मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर यांनी उपस्थित शास्रज्ञाचे आभार मानले.