Thursday, January 20, 2022

नगर ब्रेकींग खळबळजनक: या शाळेत करोनाचा उद्रेक १६ विद्यार्थी तीन शिक्षकांना लागण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १६ विदयार्थी आणि ३ शिक्षकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना

रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. यापूर्वी पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सात विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते.

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात राज्यभरातून ४०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील काहींना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत १६ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना करोनाची

लागण झाल्याचे आढळून आले. इतरांची तपासणी सुरू होती. हे विद्यार्थी सहावी ते बारावी या वर्गातील आहेत. तेथील वसतिगृहात ते राहतात.काही विद्यार्थ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची तपासणी करण्याचा निर्णय झाला.

एक एक करता त्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे तालुका आरोग्य प्रशासनाने तेथे धाव घेतली. बाधित आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना पारनेरच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे राहणारे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचीही चाचणी

करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांना बाधा झाली आहे, त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या पालकांना यासंबंधीची माहिती कळविण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!