Monday, January 17, 2022

सिलेंडरमुळे अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची नुकसान भरपाई

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: LPG गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक वापरावा, अशा सुचना वारंवार दिल्या जातात. कारण, सिलेंडरमधील छोटासा बिघाड देखील मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो.

एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे, हे जाणून तर घेणं महत्त्वाचं आहे.घरगुती गॅस कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकाला पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर देतात.

एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट होऊन अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. या इन्शुरन्ससाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांशी भागीदारी असते. डिलिव्हरीपूर्वी सिलेंडर व्यवस्थित आहे की नाही

हे तपासण्याची जबाबदारी डीलरची असते. ग्राहकाच्या घरी एलपीजी सिलेंडरमुळे झालेल्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची असते. अपघातात ग्राहकाच्या मालमत्तेचं आणि घराचे नुकसान झाल्यास, 2 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स क्लेम करता येतो.

अपघातानंतर इन्शुरन्स क्लेम करण्याची प्रक्रिया मायएलपीजी.इन (http://mylpg.in) या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे. वेबसाइटनुसार, ग्राहकाला मिळालेल्या एलपीजी कनेक्शनच्या सिलिंडरमुळं घरात एखादी दुर्घटना घडली, तर ती व्यक्ती 50 लाख रुपयांपर्यंतच्या विम्यासाठी पात्र ठरते.

1. गॅसमुळे अपघात झाल्यास जास्तीत जास्त 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाऊ शकते.

2. एलपीजी सिलेंडरचा इन्शुरन्स कव्हर मिळविण्यासाठी, अपघात झाल्यानंतर ग्राहकानं तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला आणि त्याच्या एलपीजी वितरकाला माहिती दिली पाहिजे.

3. इंडियन ऑइल, एचपीसी आणि पीबीसी सारख्या पीएसयु तेल विपणन कंपन्यांच्या वितरकांना व्यक्ती आणि मालमत्तांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हरसह अपघातांसाठी विमा पॉलिसी घ्यावी लागते.

4. ही पॉलिसी कुठल्याही ग्राहकाच्या नावे अशी नसते. मात्र, एलपीजीचा प्रत्येक ग्राहक या पॉलिसीच्या कव्हरमध्ये येतो. विशेष म्हणजे यासाठी कुठलाही प्रीमियम भरावा लागत नाही.

5. अपघात झाल्यास एफआयआरची प्रत, जखमी व्यक्तींचे मेडिकल बिल्स आणि मृत्यू झाल्यास पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत व मृत्यू प्रमाणपत्र सांभाळून ठेवा.गॅस सिलेंडरमुळं अपघात झाल्यास सर्वप्रथम पोलिसांत तक्रार नोंदवावी लागते. यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालय

अपघाताच्या कारणांची शहानिशा करते. एलपीजीमुळं अपघात असल्यास, एलपीजी वितरक एजन्सी किंवा विमा कंपनीच्या स्थानिक कार्यालयाला त्याबद्दल माहिती दिली जाते. यानंतर संबंधित विमा कंपनीकडे इन्शुरन्सचा क्लेम दाखल केला जातो.

ग्राहकाला क्लेमचा अर्ज करण्याची किंवा विमा कंपनीशी थेट संपर्क साधण्याची गरज पडत नाही.एलपीजी गॅसमुळं अपघात झाल्यास नुकसान भरपाई उपलब्ध आहे, ही बाब फारच कमी ग्राहकांना माहिती आहे.

त्यामुळं तुमच्या आसपास किंवा माहितीतील व्यक्तींच्या घरी जर असे अपघात झाले तर त्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचा सल्ला दिला पाहिजे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!