Saturday, January 22, 2022

नव्या वर्षात WhatsApp अपडेट होणार, हे पाच नवी फीचर्स येणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतासह जगभर प्रचंड लोकप्रिय असलेले व्हॉट्सअॅप WhatsApp हे मेसेजिंग अॅप अपडेट होणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) दिसतील. यापैकी

पाच प्रमुख नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) कोणती असतील याबाबत तज्ज्ञांनी संकेत दिले आहेत. अपडेट नंतर व्हॉट्सअॅपच्या चॅटिंग आणि कॉलिंगचे स्वरुप बदलून जाईल; असेही तज्ज्ञांनी सांगितले. नवा कॉलिंग इंटरफेस – WhatsApp Calls या पर्यायाचा

वापर करुन युझर इंटरनेटच्या मदतीने दुसऱ्या व्हॉट्सअॅप युझरला कॉलिंग करू शकतो. लवकरच हा कॉलिंग इंटरफेस बदलणार आहे. मॉडर्न कॉलिंग इंटरफेस आणखी आकर्षक हाताळायला सोपा असेल.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन इंडिकेटर – WhatsApp वर चॅट आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्शन मोडवर राहतील आणि इंडिकेटरद्वारे त्याबाबतची ग्वाही युझरला सतत दिली जाईल.

क्विक रिप्लाय – WhatsApp वर लवकरच quick replies हा शॉर्टकट अॅड होईल. हा पर्याय WhatsApp Business च्या युझरना आधी दिला जाईल. यामुळे व्यावसायिक वेळोवेळी प्रीसेट रिप्लाय देऊन ग्राहकांच्या संदेशांना तातडीने प्रतिसाद देऊ शकतील. यातून ग्राहक आणि व्यावसायिक यांचा संवाद वेगवान होईल.

ग्रुप अॅडमिन सबलीकरण – WhatsApp Group Admin सबलीकरण मोहिमेंतर्गत अॅडमिनच्या अधिकारांमध्ये वाढ केली जाईल. ग्रुप अॅडमिन ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने ग्रुपवर पाठवलेला मेसेज डीलीट Delet करू शकतील. यामुळे आक्षेपार्ह संदेश पाठवून तणाव निर्माण करणाऱ्यांना तसेच ग्रुपमध्ये फेक मेसेज पाठवणाऱ्यांना आळा घालणे सोपे होईल.

कम्युनिटिज – WhatsApp वर Communities तयार करण्याचा पर्याय लवकरच उपलब्ध होईल. ग्रुप अॅडमिन वेगवेगळ्या कम्युनिटी तयार करुन त्यात सदस्यांना अॅड करू शकतील.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!