Thursday, January 20, 2022

नगर ब्रेकींग:दोन कारची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात ;महिला जागीच ठार; ५ जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून पाच जण जखमी झाले आहेत. नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील

पारगाव फाटा शिवारात शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृत महिला ही हिमाचल प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली आहे.हिमाचल प्रदेश येथील पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह गोवा येथे जाण्यासाठी निघाले होते.

त्यांची कार सकाळी आठच्या सुमारास पारगाव फाटानजीक आली असता, त्यांच्या गाडीची व बारामतीवरून नगरच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरात धडक झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

जखमींना श्रीगोंदा व दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.दरम्यान, अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धावून आलेल्या नागरिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. काही वेळाने रुग्णवाहिका

आली आणि त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनास्थळी शुभम वाडगे, किरण शिंदे, अक्षय जाधव, मयूर जाधव, गणेश पवार या तरुणांनी मदतकार्य केले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!