Saturday, January 22, 2022

महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्य मंत्री टोपेंची मोठी माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढतोय. कोरोना, ओमायक्रॉन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार निर्बंध लावण्यात आले आहे.

तसेच रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.या निर्बंधांमुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का,अशी भिती सर्वसामांन्यामध्ये आहे. या लॉकडाऊन करण्याच्या मुद्द्यावरुन आणि इतर मुद्द्यांवरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे

यांनी वक्तव्य केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी  राज्यात केव्हा लॉकडाऊन लावणार याबाबतची माहिती दिली आहे.महाराष्ट्रात जेव्हा 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावणार”, अशा स्पष्ट शब्दात आरोग्यमंत्र्यांनी

लाॉकडाऊनबाबतचे संकेत दिले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी विविध मुद्द्यांवरुन प्रतिक्रिया दिली.
ओमायक्रॉन दुप्पट वेगाने वाढतोय राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार दुप्पट वेगाने होतोय. त्यामुळे सगळ्यांनी सतर्कता बाळगावी.

ओमायक्रॉनसाठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही, गरज नाही”, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून नियमावलीचं अंमलबजावणी करण्यात आली.

त्यानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उपहारगृह, सिनेमागृह आणि बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. या निर्बंधांवरुन आरोग्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीच्या उद्देशाने निर्बंध लागू करण्यात आले आहेत”,असं आरोग्यमंत्री म्हणाले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!