Friday, January 21, 2022

महाराष्ट्रात 28, 29 डिसेंबरला पावसाची हजेरी, यलो अलर्ट जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीनं राज्यात येत्या 27 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

रविवारपासून ( 26 डिसेंबर ) वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी

हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागानं 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया

जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता आहे. 27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळच्या सुमारास वातावरणात कडाक्याची थंडी जाणवली .वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक व पोषक ठरत आहे. गव्हाच्या ओंब्या धरण्याच्या अवस्थेत असलेल्या गव्हाला आणि फुले व घाटे धरण्याच्या अवस्थेतील हरभरा पिकाला थंडी फायदेशीर ठरत आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!