Tuesday, January 18, 2022

सरपंच पेरे पाटील यांच्या हस्ते कडूस पाटील यांना स्वा.निवघेकर पुरस्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कै. स्वातंत्र्यसैनिक संभाजी पाटील निवघेकर स्मृती सन्मान पुरस्कार जाहीर झाले असून आनंदराव कल्याणकर, सुमीत धोत्रे, महेश कडूस, डॉ. शिरीष अर्धापूरकर,पंजाब डक, डॉ.कल्याण अपेट, गोपाळ पाटील इजळीकर,

उमेश पावडे यांना ते जाहीर करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकार, कृषी व अर्थ क्षेत्रातील मान्यवरांना यंदाचा स्वातंत्र्यसैनिक कै. संभाजीराव पाटील निवघेकर स्मृती सन्मान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये नांदेड येथील मराठी स्वराज्य वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आनंदराव कल्याणकर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मानाचा तुरा रोवणारे आयपीएस व आयअफएस रँक मिळवणारे सुमितकुमार धोत्रे, कृषी पदवीधर संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये युवकांची

फळी निर्माण करून त्यांच्या शैक्षणिक व शेतकऱ्यांचे मित्र म्हणून कृषि साक्षरता वाढवणारे महेश कडूस पाटील, कोरोना काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल डॉ.शिरीष अर्धापूरकर यांना जाहीर झाला आहे. तसेच मागील वर्षीचे

पुरस्कार महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांना हवामानाचा अचूक अंदाज देणारे हवामानतज्ज्ञ पंजाबराव डक पाटील, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अचूक मार्गदर्शन करणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. कल्याण अपेट,

पतसंस्था बँकिंग क्षेत्रातले उमेश पावडे, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गोपाळराव पाटील इजळीकर यांची नावे आहेत. बुधवार, दि. ५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील प्रख्यात सरपंच, आदर्शगावचे प्रणेते भास्करराव पेरे पाटील यांच्या व इतर

मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवघा ता. मुदखेड येथे सायंकाळी ६ वाजता पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आयोजक विश्वनाथ पवार, शंकर पवार निवघेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.स्वातंत्र्यसैनिक संभाजी पाटील निवघेकर

प्रतिष्ठानच्या वतीने हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शेती व सहकार क्षेत्रातील व्यक्तिमत्व स्वातंत्र्यसैनिक संभाजीराव पवार निवघेकर यांच्या सन्मानार्थ त्यांनी केलेल्या जनसेवेतल्या कार्याची

ओळख व तरूण पिढीला काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यंदा भास्करराव पेरे पाटील सरपंच आदर्शगाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच महिला

कामगारांना शेतात काम करत असताना उन्हापासून संरक्षण मिळण्याकरिता सनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास निवघा व परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वनाथ पवार निवघेकर, शंकरराव पवार निवघेकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!