Tuesday, January 18, 2022

सारोळा कासारच्या रस्त्यांसाठी कडूस पाटलांची दिल्लीत खासदार विखेंशी चर्चा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र :दक्षिण नगर मधील बारे मळा ते खडकी, सारोळा (खडी क्रशर) ते खडकी गाव, राघोबा रस्ता व सारोळा स्टेशन रोड च्या रेल्वे पुला खालील दुरुस्ती व नवीन रस्ते बांधणी संदर्भात दक्षिण नगर मधील लोकप्रिय युवा नेते कडूस पाटील यांनी

आज दिल्ली येथे खासदार सुजय विखेंची भेट घेतली आहे. सारोळा कासार ग्रामपंचायत सह एकूणच चास गणात अनेक गावांमध्ये परिसरात व सारोळा कासार गावात जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

या अनुषंगाने महेश कडूस पाटील यांनी सुजय जी विखे पाटील यांची दिल्ली येथे निवासस्थानी भेट घेऊन खालील मुद्द्यावर लक्ष वेधून निवेदन दिले आहे.

१. बारे मळा ते खडकी जोडणारा रस्ता होणे आवश्यक असून जि प सदस्य यांच्या कडून आवश्यक ती कार्यवाही करुन घेऊन आपण पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत हा रस्ता केल्यास उत्तम दर्जा चा टिकाऊ रस्ता गावाला मिळेल.

२. सारोळा ते खडकी कडे जाणारा रस्त्याची परिस्थिती बैलगाडी जाऊ शकत नाही अशी आहे. तिथून दौंड महामार्ग जोडला जात असल्याने हा रस्ता देखील केंद्रीय योजने अंतर्गत आपण प्राधान्य देऊन आमच्या गावाला द्यावा.

३. राघोबा रस्ता सह स्टेशन सारोळा जुन्या पुला खाली शेजारील लहान बंधाऱ्याचे पाणी पाझरत असून, स्टेशन रस्ता पुलाखालून सुपा करता ये जा असल्याने रेल्वे विभागाशी योग्य तो संवाद साधून त्या पुला खाली देखील जॉईंट चे काम होणे गावाची गरज बनली आहे.

वरील मागण्या सुजय जी विखे पाटील यांना महेश कडूस पाटील यांनी केल्या असून, उपरोक्त तीनही मागण्या गावातील ग्रामस्थ यांच्या शी चर्चा करुन मांडल्या असून, ग्रामस्थ या खराब रस्त्यां मुळे त्रस्त झाले आहेत याचा खासदार किंवा आमदार दोन्ही

पैकी कोणीही सहानुभूती पुर्वक विचार करुन आमच्या गावाला हे रस्ते दिले पाहिजे. लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो गावातील रस्ता ही आमची गरज आहे असे देखील कडूस पाटील यांनी सांगितले आहे. केंद्रीय योजनेतून दर्जेदार बनवून

द्यावेत अशी मागणी कडूस पाटील यांनी विखेंना केली असून भविष्यात प्रत्येक लोकप्रतिनिधी ला भेटून विकासकामे आणि निधी साठी गावा साठी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थां च्या सार्वजनिक कामां करता सातत्याने भेटणार आहे असे सांगितले आहे. सदर निवेदन कृषि पदवीधर संघटना च्या वतीने दिले आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!