Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीत फूट; पवारांनी ताकद दिलेला ‘हा’ नेता भाजपासोबत!

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्षातून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड  यांचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोलेत अशोक भांगरे यांना मोठी ताकद दिली होती.

मात्र, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि भांगरे यांच्यात पटलेच नाही. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत फूट पडली असून आता भांगरे हे उघडपणे माजी आमदार पिचड यांच्यासोबत गेलेले

पाहायला मिळत आहेत. सामाजिक कामासाठी एकत्र येत असल्याचे ते दोघे सांगत असले तरी याकडे राजकारण म्हणूनच पाहिलं जात आहे.अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. ही निवडणूक

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढली गेली. निकाल काय असेल ते पुढील महिन्यात मोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, मधल्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भांगरे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड मात्र एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

तीव्र राजकीय मतभेद असलेले हे दोघे नेते आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नावर एकत्र आल्याचे सांगण्यात येते. अकोलेतील घोरपडा देवी मंदिरात झालेल्या कार्यक्रमानिमित्त दोघे एका व्यासपीठावर आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मंदिरात एकत्र चर्चा केली.

त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्नांची सोडवणूक करू. सामाजिक प्रश्नांबाबत आमचं एकमत आहे. राजकीय पक्षाचे काम करत असताना सामाजिक

बांधिलकी जपली पाहिजे. आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या देव, धर्म, पारंपारिक चालीरिती जोपासत आला आहे. वर्षानुवर्षे तो महादेवाला मानतो. त्या परंपरेला कुणी छेद देत असेल तर चालणार नाही, असं भांगरे आणि पिचड सांगत आहेत.

मात्र हे या दोघांच्या एकत्र येण्याचे निमित्त असल्याची चर्चा सुरू आहे. तसं झालं तर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का असेल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!