Thursday, October 5, 2023

भाजपचे चार ते पाच आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?; बड्या नेत्याचा दावा

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. कर्नाटक विधानसभा काबिज करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. १० मे रोजी

मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत.मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील कर्नाटक विधानसभा

निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा

शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कमीत कमी ४० जागा लढणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी दिली. इतकंच

नाही तर, भाजपचे विद्यमान ४ ते ५ आमदार आमच्या संपर्कात आहे, कर्नाटक निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा सुद्धा त्यांनी केला आहे.दरम्यान काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी

उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामधून उत्तर कर्नाटकातील भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथनीमधून तिकीट दिले आहे. सवदी यांनी भाजपाने तिकीट न दिल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसने आज तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये ४३ मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेत. १२४ उमेदवारांची यादी काँग्रेसने २५ मार्चला जारी केली होती. यानंतर ४२ उमेदवारांची यादी ६ एप्रिलला जारी करण्यात आली होती.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!