Tuesday, January 18, 2022

भेंडा गावात सलग सहा दिवस कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भेंडा बुद्रुक गावातील व परिसरातील नागरिक,कारखाना कामगार,ऊस तोडणी कामगार, व्यापारी,ट्रॅक्टर व ट्रक ड्रायव्हर यांचे लसीकरण व्हावे यासाठी सोमवार दि.27 डिसेंबर ते शनिवार दि.1 जानेवारी या कालावधीत

 सलग सहा दिवस कोरोना लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला असून नागरिकांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सरपंच सौ.वैशाली शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे आरोग्य केंद्रामध्ये सोमवार दि.27 डिसेंबर 2021 ते शनिवार दि. 1 जानेवारी 2022 पर्यंत सलग 6 दिवस कोरोना लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांचा कोरोना लसीचा पहिला अथवा दुसरा डोस घ्यावयाचा राहिला असेल अशा सर्व नागरिकांनी या कॅम्प मध्ये लसीकरण करून घ्यावे ,लसीकरणासाठी येतांना सोबत

आधार कार्ड, मतदान कार्ड व मोबाईल आणावे
असे आवाहन उपसरपंच दादासाहेब गजरे,ग्रामविकास अधिकारी रेवणनाथ भिसे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!