Thursday, January 20, 2022

या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य;जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत त्यांचा प्रभाव फक्त…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आपल्या विविध विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मध्यप्रदेशची राजधानी

भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या थीमबद्दल

बोलताना ते म्हणाले की, “जीन्स घालणाऱ्या मुलींना पंतप्रधान मोदी आवडत नाहीत. त्यांचा प्रभाव केवळ ४० वर्षांवरील महिलांवर आहे.”जन जागरण अभियानाच्या निमित्ताने शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिग्विजय सिंह

म्हणाले की, “जीन्स घालणाऱ्या मुली आणि फोन ठेवणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत. फक्त ४० ते ५० वयोगटातील महिलांवर मोदींचा प्रभाव आहे. तसेच २०२४ मध्ये भाजपा पुन्हा जिंकल्यास भारतीय राज्यघटना बदलली जाईल, आरक्षण संपेल असं दिग्विजय सिंह म्हणाले.

इथे असे देखील हिंदू आहेत जे गोमांस खातात आणि म्हणतात कुठे लिहिलं आहे गोमांस खाऊ नये आणि बहुतांश हिंदू जे आहे ते गोहत्येच्या विरोधात आहेत. स्वत: सावरकर, सावरकरांबद्दल भाजपाकडून बरच सांगितलं जातं, त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं

आहे की, हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. स्वत: त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलं आहे की, हिंदू धर्मचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही आणि हे देखील लिहिलं आहे की, गाय असा प्राणी आहे की स्वत:च्या शेणात लोळण घेते, ती कशी

काय आपली माता होऊ शकते? आणि तिचं गोमांस खाण्यात काही चुकीच नाही, हे सावरकरांनी स्वत: म्हटलं आहे.” असं दिग्विजय सिंह कार्यक्रमात म्हणाले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!