Saturday, January 22, 2022

महाराष्ट्र हादरला:१५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डोणजे तालुका हवेली येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक

कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील २ आरोपींना या गुन्ह्यातही सहभाग आहे.निलेश नेटके (वय- २१) लक्ष्मण पाटील (वय- २२) आणि इतर

३ अल्पवयीन सर्व राहणार डोणजे तालुका हवेली जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून यातील निलेश नेटके हा अटक असून लक्ष्मण पाटील फरार झाला आहे. २ दिवसामध्ये २ वेळा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार

गुन्हा दाखल झाल्याने डोणजे परिसरातील पालक आणि शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे.हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करून त्याचे व्हिडिओ तयार केले होते. घडलेल्या प्रकाराविषयी

वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीला आणि तिच्या आईला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलीने याविषयी माहिती दिली आहे.

त्यानुसार हवेली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील आणि हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!