Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यातील हे दोन कट्टर राजकीय विरोधक आले एकाच व्यासपीठावर अन्

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथे काळे व कोल्हे परिवाराचा वर्चस्व वाद आहे. हा वाद बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे  व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे

शनिवारी एकाच व्यासपीठावर दिसून आले. मागील महिन्यात कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नावर काळे व कोल्हे समर्थकांत शाब्दिक वाद झाले होते.माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून

कोपरगाव नगरपालिकेच्या इमारतीला निधी मंजूर करून कामास सुरवात केली होती. तळमजल्याचे लोकार्पण आज आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजय वहाडणे होते. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोपरगाव पालिकेच्या इतिहासात प्रथमच आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व नगराध्यक्ष विजय वहाडणे एकाच व्यासपीठावर आले. शहराच्या पाणीप्रश्नात आमदारांनी लक्ष घालून शहरवासीयांची तहान भागवावी, असे कोल्हे म्हणाल्या.

आमदार काळेंनी ही बाब सकारात्मक घेतली. निळवंडे व 120 कोटींच्या पाणीयोजनेसाठी आजी-माजी आमदारांची वेळ घेऊन कार्यकर्तेविरहित बैठकीचे नियोजन करू. त्यातून शहरहितासाठी दोन्ही प्रश्न निश्चित मार्गी लागतील, अशी प्रतिक्रिया

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली. या मनोमीलनामुळे सर्वसामान्य कोपरगावकरांनी समाधान व्यक्त केले.आमदार काळे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहरविकासासाठी आजवर 12 कोटी रुपयांचा निधी दिला.

यापुढील काळातही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.कोल्हे म्हणाल्या, की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका इमारतीसाठी मोठा निधी दिला. त्यातून हे स्वप्न साकार झाले. पुढील कामात आमदारांनी लक्ष घालावे.

शहरविकासाचे 30 ते 40 कोटी रुपयांचे प्रस्ताव मार्गी लावले. शहराच्या चांगल्या कामासाठी सर्व जण एकत्र, एकोप्याने राहिले, तर सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत. शहर पाणीप्रश्नी मी सर्वांसोबत आहे. आमदारांनी आता शहरवासीयांची तहान भागवावी, ही कळकळीची विनंती.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!