माय महाराष्ट्र न्यूज: जुनी पेंशन लागू करावी या मागणीसाठी शिक्षकांनी संप पुकारल्याने दहावी, बारावीचा निकाल लाबंण्याची चिन्हे होती.
मात्र, संपानंतर लगेचच शिक्षक कामावर रुजू झाल्याने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणी व मॉडरेशनचे हे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल वेळेत लागणार आहे.
बारावीचा निकाल मे अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाली. या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्याची
नोंदणी झाली होती. दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. या परीक्षेसाठी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बारावीच्या
उत्तरपत्रिका तपासणीे व मॉडरेशनचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी व मॉडरेशनचे कामकाज 20 एप्रिलपर्यंत पूूर्ण होणार आहे.
निकालाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी एक-दीड महिन्याचा कालावधी निश्चित लागणार आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लावण्याच्या दृष्टीेने कामकाजाचे नियोजन
करण्यात आले आहे. दहावीच्या निकालासाठी जूनचा दुसऱ्या आठवड्याची वाट पहावी लागणार आहे.
-शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ