Tuesday, January 18, 2022

अजबच! एकाच घरातील २ सुना गवंडीसोबत फरार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:घरातील दोन सुना रिपेरिंगसाठी घरी आलेल्या गवंड्यांसोबत पळून गेल्या. हा प्रकार पाहून कुटुंबीय देखील चक्रावले आहेत. त्यांनी पोलीस तक्रार केली. त्यावेळी खरा प्रकार समोर आला.

ही घटना गुजरातमधील हालवडा येथे घडली. या ठिकाणी घरातील २ सुना गवंड्यांसोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक वृत्तमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका घरात रिपेरिंगचं काम सुरु होतं. यासाठी घरी अनेक कामगार आले होते.

या कामगारांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी घरातील सुनांवर सोपवण्यात आली होती. याच दरम्यान सुंनांची मैत्री गवंड्यांसोबत झाली. पुढे त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. आणि एकेदिवशी या दोन्ही सुना घर सोडून पळून गेल्या.

सुना घरात नाहीत हा प्रकार पाहून कुटुंबीय चक्रावले. मग त्यांनी लगेचच पोलीस तक्रार केली. पोलिसांनी सर्वप्रथम त्यांच्या मोबाईल कॉलिंगचे रेकॉर्ड्स तपासले. त्यावेळी खरा प्रकार समोर आला. या दोन्ही सुना गवंड्यांसोबत पळाल्या होत्या.

मग पोलिसांनी त्यांचे फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांचं लोकेशन मुर्शिदाबाद येथे दाखवत होतं. परंतु त्यानंतर ते मुंबईत पळाले. पोलिसांची एक स्पेशल टीम आता मुंबईत येऊन त्यांचा तपास करणार आहे.

घरातील मोठ्या सुनेसोबतच लहान सूनही आपल्या सहा वर्षाच्या मुलासोबत फरार झाली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!