Saturday, January 22, 2022

मुलांचं लसीकरणाबाबत केंद्राकडून नियमावली जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आता १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु होत आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील आजारी ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील संपूर्ण नियमावली केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केली.लसींचा प्राधान्यक्रम काय असेल? कधी

मिळणार बूस्टर डोस?१५ ते १८ वयोगटातील मुलांना येत्या ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ लहान मुलांसाठी असलेली कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्सना

येत्या १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण त्यांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेल्यांनाच हा बूस्टर डोस घेता येणार आहे. आणि ६० वर्षांवरील नागरिक जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, अशांना १० जानेवारी २०२२ पासूनच

बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण या लोकांना सरसकट बूस्टर डोस मिळणार नाही. तर त्यांच्या डॉक्टरांनी जर सुचवलं की त्यांना बूस्टर डोसची गरज आहे तरच अशा नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे.

पण त्यासाठी देखील या नागरिकांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!