Tuesday, January 18, 2022

अत्यंत महत्त्वाची बातमी:नगर जिल्ह्यातून पुण्याला जात असेल तर महामार्गावरील वाहतुकीत बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: 1 जानेवारी 2022 रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमा निमित्त 31 जानेवारी सायंकाळी सात वाजल्या पासून 1 जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत पुणे अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे. याशिवाय अभिवादनासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक 29 तासासाठी वळविण्यात येणार आहे.

आशा प्रकारे वाहतूक वळविण्यात आली आहे. 1) पुण्याहून नगर कडे जाणारी जड वाहतूक खराडी बायपास मार्गे केडगाव – चौफुल – न्हवरा – शिरूर मार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे. 2) सोलापूरहुन चाकण कडे जाणारी वाहतूक खराडी बायपास मार्ग विश्रांतवाडी – आळंदी – चाकण मार्गे वळविण्यात येणार आहे.

3) मुंबईहून नगरकडे जाणारे जड वाहतूक वडगाव मावळ – चाकण – खेड – मंचर – नारायणगाव आळेफाटा – नगर 4) मुंबई हुन नगर कडे जाणारी जड वाहने चाकण – खेड – पाबळ – शिरूर मार्ग नगर येथे वळविण्यात येणार आहे.

अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध ठिकाणी वाहनानुसार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पार्किंग स्थळापासून विजयस्तंभ पी एम टी बस ची सोय करण्यात आली आहे.पार्किंग स्थळे पुढील प्रमाणेपुण्याहून येणाऱ्या

वाहनांसाठी ( कार ) * लोणीकंद येथील आपले घर शेजारी हनुमंत कंद यांची मोकळी जागा.* लोणीकंद येथील आपले घर शेजारी संदीप सातव यांची मोकळी जागा.* लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी सागर गायकवाड यांची मोकळी जागा* तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारील मोकळी जागा.बस साठी – आपले घर सोसायटी मागील बाजू.

आळंदी कडून येणाऱ्या वाहनांसाठी* तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे* तुळापूर रोड वाय पॉईंट शेजारील मोकळी जागाथेऊर केसनंद कडून येणाऱ्या वाहनासाठी –* सोमवंशी अकादमी समोरील मोकळी जागा* खंडोबाचा माळ.अष्टापूर, डोंगरगाव,

पेरणेकडून येणाऱ्या वाहनासाठी* पेरणे गाव छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा समोरील मोकळी जागादुचाकी साठी पार्किंगटाटा मोटर्स समोरील मोकळे मैदान.ज्योतिबा पार्क गो शाळा शेजारील मैदान.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!