Monday, January 17, 2022

यशोगाथा:नगर जिल्ह्यातील या विद्यार्थ्याने पेरूच्या बागेतून मिळवले तब्बल १५ लाख उत्पन्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ४० गुंठ्यात तब्बल पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळवत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेटकेवाडी येथील विशाल अंबर

भोसले हा विद्यार्थी सदगुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव या ठिकाणी शिक्षण घेत आहे. मात्र शिक्षण घेत असतानाच त्याने ४० गुंठे क्षेत्रामध्ये पेरूचे झाडे लावून पंधरा लाख रुपये उत्पादन घेत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांना

सातत्याने दुष्काळसदृश परिस्थिती, अपूर्ण पाणी यासह सातत्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. पारंपरिक शेती, व पारंपारिक पीक पद्धती याच पद्धतीने शेतकरी पिढ्यानपिढ्या शेती करत आहे.

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे पीक चांगले आले, तर त्याला भाव मिळत नाही. भाव असेल तर पीक नाही आणि सर्व काही सुरळीत असेल, तर अतिवृष्टी, किंवा दुष्काळाचा फटका ठरलेला. मात्र, सर्व पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत कृषी महाविद्यालय

मध्ये शिक्षण घेणाऱ्या विशाल भोसले यांनी तालुक्यातील नेटकेवाडी येथील त्याच्या स्वतःच्या शेतीमध्ये तैवान जातीची पेरूची ४० गुंठे क्षेत्रामध्ये झाडे लावली. आणि त्यांनी कृषी महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीची शिक्षण घेतले, त्या ज्ञानाचा वापर करून

आधुनिक पद्धतीने या पेरूच्या झाडांची लागवडीपासून सर्व शास्त्रीय पद्धतीचा वापर केला.आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर केल्यामुळे अवघ्या कमी क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्याने तब्बल पंधरा लाख रुपयांचे उत्पादन घेतले. त्याच्या या वाटचालीमध्ये त्याचे वडील

अंबर भोसले यांनी त्याला मोलाची साथ दिली, व तो राबवत असलेल्या या प्रकल्पाला त्यांनी त्याला पाठिंबा दिला. विशाल भोसले त्याने लावलेली पेरूची बाग पाहण्यासाठी कृषी महाविद्यालयातील त्याची सर्व शिक्षक, याप्रमाणे सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक

अध्यक्ष शंकरराव नेवसे यांच्यासह अनेकांनी भेट देऊन त्याचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी देखील विशालचा आदर्श घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!