Friday, January 21, 2022

महिलेच्या पायांना स्पर्श करणं हाही विनयभंगच: हायकोर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:2014 साली जालन्यातील एका तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात अपरात्री घुसून तिच्या पायाला स्पर्श केला होता. याप्रकरणी पीडित महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित तरुणाला कनिष्ठ

न्यायालयाने दोषी ठरवत, त्याला दोन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला होता. पण आरोपी तरुणाने कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणी सुनावणी

 झाल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने देखील कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर यांनी आरोपी तरुणाला दोषी ठरत त्याला दोन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे.

पीडित महिलेनं 5 जुलै 2014 साली घराशेजारी राहणाऱ्या परमेश्वर ढगे या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आदल्या दिवशी सायंकाळी आरोपी तरुण पीडित महिलेच्या घरी आला होता. यावेळी पीडितेचा पती घरी नसल्याचा आणि तो

आज रात्री घरी येणार नसल्याची खात्री करून गेला होता. यानंतर रात्री अकराच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी झोपली असताना, आरोपी तरुण पीडित महिलेच्या घरात शिरला होता.

यावेळी त्याने पीडित महिलेच्या बेडवर बसून तिच्या पायांवरून हात फिरवला होता. पण हात फिरवताच जाग आल्याने पीडित महिलेनं आरडाओरड केली. यानंतर आरोपी घरातून पळून गेला. पीडित महिलेनं घडलेला सर्व प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी 5 जुलै 2014 रोजी पीडितेनं पोलीस ठाण्यात जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पण पीडित महिलेचा विनयभंग करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं सांगत तरुणाने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी न्यायमूर्ती सेवलीकर यांनी म्हटलं की, दोषी परमेश्वर ढगे याचं कृत्य विनयशीलतेला धक्का देणारं आहे. शिवाय एवढ्या रात्री महिलेच्या घरी जाण्याचं अन्य कोणतंही कारण नव्हतं. तसेच पीडितेच्या घरी जाऊन तिच्या बेडवर बसून तिच्या पायांना

स्पर्श करणं, हे कृत्य लैंगिक हेतूने होतं. शिवाय एवढ्या रात्री महिलेच्या घरी जाण्याचं कारण काय? याबाबत समाधानकारण स्पष्टीकरण ढगे याला देता आलं नाही.शिवाय रात्रीच्या वेळी महिलेच्या संमतीशिवाय तिच्या कोणत्याही अंगाला

स्पर्श करणं हा विनयभंगच होय, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाने ढगेला दोषी ठरवण्यात कोणतीही चूक केली नसल्याचंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!