Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकिंग:तरुण व्यवसायिकांची सुसाईट नोट लिहून आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (पुसद) येथील रहिवासी असलेल्या व्यावसायिक तरुणाने सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी(ता.२७)उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुसद शहरातील वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीरामपूर येथील पंचवटी हनुमान मंदिर परिसराजवळील रहिवासी व पुसद शहरातील ओम नेट कॅफेचे संचालक सुरेंद्र डिंगंबर निमकर (वय-३२वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे.

सुरेंद्र यांचे मोतीनगर येथील दत्त मंदिरासमोर असलेल्या चक्करवार कॉम्प्लेसमध्ये ओम नेट कॅफेचा व्यवसाय होता. सुरेंद्र व प्रतीक हे दोघे भाऊ रविवारी (ता.२६) रात्री दरम्यान जेवण करून नेहमीप्रमाणे घरातील हॉलमध्ये झोपले होते. प्रतिक सकाळी

उठल्यानंतर त्याने सुरेंद्र दिसत नसल्याने त्याला दुसर्‍या खोलीत बघितले असता त्याने दुसर्‍या खोलीतील स्लॅबच्या लोखंडी कडीला ओढणी द्वारे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले.दरम्यान सुरेंद्रने आत्महत्येपूर्वी

सुसाईड नोट मध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहुन ठेवले ही घटना सोमवारी ता.२७ डिसेंबरला सकाळी पहाटेच्या सुमारास उघड झाली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची माहिती प्रतिक डिंगाबर निमकर यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह

उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!