Thursday, January 20, 2022

३१ ला डिसेंबरला साईंच्या दर्शनासाठी जात असेल तर हि बातमी वाचून जा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी रात्री शिर्डीतील साई समादी मंदीर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

यांच्या सूचनेनंतर साईसंस्थानने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय शेजारती आणि काकड आरतीलादेखील भाविकांना प्रवेश दिला जाणार नाहीये. साई संस्थानच्या या निर्णयमुळे नवीन वर्षाची सुरुवात साई बाबांच्या दर्शनाने करणाऱ्या साई भक्तांचा यामुळे हिरमोड झाला आहे.

दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री भविकानां दर्शनासाठी साई समाधी मंदीर उघडे ठेवले जात होते. मात्र राज्यात वाढत्या ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येमुळे साई समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. कोरोनाच्या

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 25 डिसेंबर 2021 पासून राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साई मंदीर भाविकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सध्या देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच कोरोनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्‍या होत्या. त्‍यानुसार

25 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, याच धर्तीवर साई मंदीर भाविकांसाठी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय राज्‍य शासनापर्यंत समाधी

मंदिरातील रात्री 10.30 आणि पहाटेची 4.30 ला होणाऱ्या आरतीच्यावेळी भाविकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचेदेखील प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!