Saturday, November 27, 2021

फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यात वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू केला. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला.

मात्र, त्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षाने लॉकडाऊनच्या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर निशाणा साधला.लॉकडाऊनसंदर्भात बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

“मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकंच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचं काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे.

जरा राज्यघटना वाचा. नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?” असं राणे म्हणाले.काय करतात मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून? एक-दोन दिवसांत मुंबईत हॉस्पिटल उभं करू शकत नाही? मुंबईत हवं ते करू शकतो माणूस. फक्त मृतांची संख्या, बाधितांची संख्या जाहीर करायची.

हे कमी-ते कमी असं मुख्यमंत्री जाहीर करतात. जनाची नाही, मनाची तरी आहे का? कमी असेल तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री असतो. नुसतं खुर्चीवर बसून चालत नाही. याला कर्तृत्व लागतं. मुख्यमंत्री मास्क लावा, हे करा, ते करा असं सांगतात का? दीड हजार देतो हे सांगतायत.

एखाद्या क्लर्क किंवा अधिकाऱ्याला सांगा जाहीर करायला. राज्य आर्थिक संकटात टाकायचं काम सुरू आहे”, असं देखील नारायण राणे म्हणाले आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!