Thursday, January 20, 2022

माणुसकीला हादरवणारी घटना:मूल होत नसल्याने सुनेसोबत सासऱ्याचं विकृत कृत्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सुनेला मूल होत नाही, म्हणून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपी सासऱ्याने

पीडित महिलेचे आंघोळ करतानाचे अश्लील व्हिडीओ शूट करून तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी सासरा पीडित महिलेवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी विनयभंगासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखलकेला आहे. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत, पोलिसांनी तातडीने आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.

या घटनेचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी पीडित महिला घरी एकटी असताना, सासऱ्याने तिच्या अंगावर हात टाकून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

सासऱ्याकडून होणारी बळजबरी पाहून पीडित महिलेनं आरडाओरडा केला, त्यामुळे घाबरलेल्या सासऱ्याने तिला सोडलं. पीडित महिलेनं हा प्रकार तिच्या पतीला सांगितला असता, त्यानं पीडितेची समजूत काढली.

पण आरोपी सासऱ्याची खोड काही मोडली नाही.आरोपी सासऱ्याने पीडित महिलेचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडीओ शूट केला आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपीनं पुन्हा एकदा पीडित महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आहे.

तुला माझ्या मुलापासून मुल होणार नाही, तू माझ्याशी संबंध ठेव असं म्हणत आरोपीनं पीडितेवर दबाव टाकायला सुरुवात केली. अखेर आरोपी सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. यानंतर

पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सासऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!