Saturday, January 22, 2022

नगरमध्ये महाविकास आघाडीबाबत भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 

विधानसभेच्या अध्यक्षपदावरून रणकंदन पेटलेले असतानाच महाविकास आघाडीचे ५० ते ६० आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा माजी मंत्री तथा भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

शिर्डीत साई दर्शनानंतर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्य सरकारला आवाजी मतदानाचा कायदा आणण्याची गरज का पडली? गुप्त मतदानाचा

कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास नाही का? असे प्रश्न उपस्थित करत, महाविकास आघाडी सरकारचे ५० ते ६० आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. १६-१६ महिने मुख्यमंत्री भेटत नाहीत,

आमदारांची कामं होत नाहीत, त्यामुळे आमदार नाराज असल्याचं बावनकुळे म्हणाले. आवाजी मतदानाची पद्धत घटनाबाह्य आहे की घटनात्मक याचा निर्णय राज्यपाल घेतील. मात्र राज्यपाल चुकीचं पत्र सरकारला देणार नाहीत. या सरकारमध्ये

खरंच धमक असेल तर गुप्त मतदान घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असं आव्हान बावनकुळे यांनी दिलं.भाजप सरकारच्या काळात थकबाकी वाढल्याने ऊर्जा खाते तोट्यात आल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया

देताना राज्याच्या ऊर्जा मंत्र्याला प्रशिक्षणाची गरज असून मी काही दिवस त्यांना प्रशिक्षण द्यायला तयार असल्याचं ते म्हणाले. फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटींची वीज दिली. मात्र एकही कनेक्शन कापल गेलं नाही.

४९ हजार कोटींची थकबाकी राहूनही भाजप सरकार जाताना तिन्ही वीज कंपन्या नफ्यात होत्या. आता सरकारनं शेतकऱ्यांना विज दिली म्हणून कंपन्या तोट्यात आल्या हे धादांत खोटं आहे. शेतकऱ्यांना विज दिल्यानं कंपन्या कधीही तोट्यात येत नाहीत.

आमच्यामुळं तूट वाढली असा दावा जर हे सरकार असेल तर पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पाच वर्षे वीज न कापता शेतकऱ्यांना वीज देऊ, असं बावनकुळे म्हणाले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!