Monday, January 17, 2022

नगर ब्रेकिंग:एकतर्फी प्रेमातून युवकाचा विवाहितेला त्रास, कंटाळून विवाहितेने पेटवून घेतले….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तु मला आवडतेस व मी तुला पसंत करतो. तु तुझ्या नवऱ्याला सोड चिठ्ठी दे, नाही दिली तर मी तुला पळवुन घेवुन जाईन अशा प्रकारच्या युवकाच्या त्रासाला कंटाळून

विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहेशितल स्वामी चव्हाण (वय 26 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत विवाहितेचे

नाव आहे. युवक अभिमन्यू शिवराम भोसले (वय अंदाजे 23 रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितल ही मूळची गुंडेगाव येथील असून घोसपुरी हे तिचे सासर आहे. घटना घडली त्यावेळी शितल माहेरी वडिलाकडे आलेली होती. अभिमन्यू हा शितलला म्हणाला, तु मला आवडतेस व मी तुला पसंत करतो.

तु तुझ्या नवऱ्याला सोड चिठ्ठी दे, नाही दिली तर मी तुला पळवुन घेवुन जाईन, अशी धमकी दिली.शितल ने अभिमन्यूला समजावून सांगितले; पण अभिमन्यू तिच्या प्रेमात वेडा झाला होता, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अभिमन्यूचा

त्रास असाह्य झाल्यानं शितल ने पेटून घेतले. यामध्ये शितल जास्त भाजली होती. शितलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिला त्रास देणारा युवक अभिमन्यू शिवराम भोसले

(वय अंदाजे 23 रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पसार झाला आहे.

पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी गेले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!