Thursday, January 20, 2022

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात शेती करण्यावर भर द्यावा-डॉ.सिंह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

जमिनीतील जलस्तर खाली खाली जात असल्याने शेतकरी व कृषी विज्ञान केंद्रांनी कमी पाण्यात शेती करण्यावर भर द्यावा असे आवाहन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे कृषि विस्तार उपमहासंचालक डॉ.ए.के.सिंह यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या कृषि विज्ञान केंद्राच्या दहिगाव-ने येथील प्रशासकीय इमारत आणि शेतकरी निवास इमारतीचे उद्घाटन डॉ.सिंह यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ.सिंह पुढे म्हणाले,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान केंद्र व राज्य शासनापुढे आहे.त्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होत आहेत.सर्वांसाठी मॉडेल ठरावे अशा देशभरातील 75 हजार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.कृषि विज्ञान केंद्राच्या मदतीने उत्पन्न दुप्पट झालेल्या 60 हजार शेतकऱ्यांची आज पर्यंत माहिती मिळालेली आहे.पारंपरिक शेतीला लघु उद्योग,जोडधंद्याची जोड द्यावी. शेतीमध्ये रासायनिक खते व औषधांचा वाढता वापर ही चिंतेची बाब आहे.त्यामुळे शेती रासायनिक होत असून शेती माला मध्ये ही त्याचा अंश शिल्लक राहात आहे.नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.जास्त उत्पादन झालेला आणि साठवता न येणारा शेतीमाल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते,ती वेळ येऊन नये यासाठी लहान लहान प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत.शेतीमाल काढल्या नंतर शेतात शिल्लक रहाणारे अवशेष जाळून टाकल्यास जमीन खराब होते आणि पिकांसाठी आवश्यक असलेले जिवाणू ही नष्ट होतात त्यामुळे शेतीमालाचे अवशेष जाळू नका असे आवाहन ही त्यांनी केले.दहिगाव-ने कृषि विज्ञान केंद्राचे कार्य उल्लेखनीय असून या केंद्रामार्फत सुरु असलेल्या विविध 30 प्रात्यक्षिक प्रकल्पांमधील तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपयोग करून घ्यावा असे त्यांनी सुचविले.

यावेळी 7 वी शास्रीय सल्लागार सभा ही श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, आयसीएआर अटारी झोन-8 पुणेचे संचालक डॉ.लाखन सिंह, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, काकासाहेब शिंदे, सचिव अनिल शेवाळे, रविंद्र मोटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. शरद गडाख,कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोलंकी, डॉ.अशोकराव ढगे, नगर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी भैय्यालाल टेकाम, शशिकांत जाधव, प्रगतशील शेतकरी काकासाहेब काळे,मिलिंद कुलकर्णी,आप्पासाहेब फटांगडे, रतन मगर, हुकूम बाबा नवले, नामदेव चेडे, बाळासाहेब मरकड, संजय तनपुरे, सूर्यभान नवले, रेवणनाथ उकिर्डे, सतीश विधाटे, सोमेश्वर लवांडे, सौ.पुष्पा नवले आदी उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना नरेंद्र घुले पाटील म्हणाले,परिसरातील शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्राचा उपयोग आपल्या शेतीत प्रगती करून घेण्यासाठी करावा.

केंद्र प्रमुख डॉ. कौशिक शामसुंदर यांनी
कृषि विज्ञान केंद्रा मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देतांना सांगितले की 7 तालुक्यात आणि 679 गावांचे कार्यक्षेत्र आहे.शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दहीगाव-ने कृषी विज्ञान केंद्र “कांदा तंत्र ” या अप चे अनावरण करण्यात आले. बैठीकीपूर्वी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना केव्हीकेच्या प्रक्षेत्रावरील विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागडे सर यांनी केले तर आभार माणिक लाखे यांनी मानले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!