Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यात याठिकाणी तरुणीच्या घरात घुसून अंगाला हात लावत विनयभंग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात तरूणीच्या घरात घुसून मोबाईल नंबर मागितला तसेच तिच्या अंगाला झटत जवळीक साधण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडली

असून या प्रकरणी नितीन अडागळे याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, २३ वर्षीय तरूणी ही दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजे सुमारास तिच्या घरातील झोपण्याच्या खोलीत होती.

यावेळी आरोपी नितीन अडागळे हा अनाधिकृतपणे त्या तरूणीच्या घरात घुसला.त्याने त्या तरूणीला मोबाईल नंबरची मागणी केली. तसेच तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगाला हात लावून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला.

सदर तरूणीने तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नितीन शहाजी अडागळे राहणार राहुरी खुर्द ता. राहुरी. याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक

 तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!