Friday, December 3, 2021

या धरणाची पाणीपातळी खालावली; नगर जिल्ह्यातील या दोन तालुक्यातील पिकांना बसणार फटका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :नगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या दोन तालुक्यांतील सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱया उजनी धरणातील पाणीपातळी सध्या खालावते आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकांना फटका बसणार आहे. गेल्या वर्षी हे धरण 110 टक्के भरले होते.

उन्हाळ्यामुळे पाण्याची वाढती मागणी तसेच हवामान विभागाने यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने उजनीतील पाणी यंदा घटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गतवर्षीच्या पावसामुळे उजनी धरण

110 टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, सध्या सर्वत्र पाण्याची वाढती मागणी आहे. त्यामुळे शेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू असून, अनेक पाणी योजनांसाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी खर्ची होत आहे.

त्याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणीसाठय़ात घट होत आहे. सध्या धरणात एकूण 77.97 टीएमसी म्हणजेच 26.71 टक्के पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा 14.31 टीएमसी असून, गतवर्षी यावेळी हा साठा 20 टीएमसी होता.

आणखी सुमारे दोन महिने हा साठा वापरायचा असल्याने जपून पाणी वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!