Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकिंग:भरधाव टेम्पोच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर- मांलुजा रस्त्यावर माती वाहतुक करणाऱ्या भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

माती वाहतुक करणाऱ्या (MH-21-D-8977) क्रमांकाच्या टेम्पोने बुधवारी दुपारच्या सुमारास मांलुजा शिवारात दुचाकीस्वार जोडप्याला चिरडले. या अपघातात काशिनाथ कोळेकर (वय ५०) व आदिकाबाई कोळेकर (वय ४६, रा. मांजरी ता. राहुरी) या जोडप्याचा दुर्वैवी अंत झाला.

कोळेकर पती- पत्नी एका कार्यक्रमाला सकाळी हजेरी लावून दुचाकीवर बेलापूरच्या दिशेने आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला माती वाहतूक करणाऱ्या टेम्पोची समोरून जोराची धडक बसली.

त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. दरम्यान, रस्त्यावरील प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती. तोपर्यंत टेम्पो चालकाने तेथून पळ काढला होता.

अपघाताची माहिती मिळताच मालुंजा येथील सरपंच अच्युत बडाख, उपसरपंच रावसाहेब शेंडगे, कृष्णाकांत बडाख, अॅड कचेश्वर बडाख, संजय बडाख यांनी मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर उत्तरणीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह कामगार रुग्णालयात पाठविण्यात आले.

पोलिसांनी टेम्पो व दुचाकी ताब्यात घेवून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे. पोलिस निरिक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण सुरशे अधिक तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!